कोहली ते धोनीपर्यंत... भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची युनिक नावे आणि अर्थ

महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि सुरेश रैना यांनी आपल्या मुलांना अतिशय युनिक नावे दिली आहे.

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनीला एक मुलगी आहे. ज्याचे नाव झिवा सिंह धोनी असे आहे. झिवा अतिशय युनिक नाव आहे. झिवाचा अर्थ आहे प्रकाश आणि गॉड ऑफ लाइट.

कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. आई दुर्गाचे नाव वामिका असे आहे.

कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. आई दुर्गाचे नाव वामिका असे आहे.

'वामिका' हे नाव अनुष्का आणि विराटच्या नावाचे कॉम्बिनेशन आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्या मुलीचे नाव समायरा असं आहे. ज्याचा अर्थ आहे आकर्षक आणि सुंदर. रोहित आणि समायरामध्ये अतिशय चांगला बॉंड आहे. अनेकदा हे दोघं छान वेळ घालवताना दिसतं.

क्रिकेटर शिखर धवनला एक मुलगा आहे. ज्याचे नाव झोरावर असं आहे. झोरावर नावाचा अर्थ आहे शक्तिशाली.

सुरेश रैना यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे नाव ग्रेसिया ज्याचा अर्थ ईश्वरी आशिर्वाद आणि मुलाचे नाव रियो असे आहे. रियोचा अर्थ आहे नदी. जे प्रकृती, शक्ती आणि मानवाचे रुप.

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य असं आहे. ऋषीमुनींच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story