भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ बऱ्याच दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे समोर आले. मोहम्मद शमी हा त्याच्या पत्नीपेक्षा 10 वर्षांनी लहान असल्याचे समजले.
विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्न केले. तर अनुष्का ही विराटपेक्षा फक्त सहा महिन्यांनी मोठी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे लग्न साक्षी सिंह रावत सोबत झाले. दुसरी सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटरची पत्नी म्हणून ओळखली जाणारी साक्षी सिंह धोनीची एकूण संपत्ती सुमारे INR 41 कोटी आहे जी .तर साक्षी ही एमएस धोनीपेक्षा सात वर्षांनी लहान आहे.
डॉ.अंजलीचे लग्न 24 मे 1995 मध्ये सचिन तेंडुलकरसोबत झाले. तर अंजली तेंडुलकर सचिन तेंडुलकरपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.
रॉबिन उथप्पाने 2016 मध्ये शीथल गौथम सोबत लग्न केले. तर या दोघांमध्ये 4 वर्षाचा फरक आहे. शीथल गौथम ही रॉबिनपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणेने 26 सप्टेंबर 2014 रोजी राधिका धोपावकर सोबत लग्न केले. तर या दोघांमध्ये 3 वर्षाचा फरक आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनने 15 मार्च 2021 रोजी लग्न केले. तर त्यांच्यामध्ये 2 वर्ष 7 महिन्याचा फरक आहे.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील महान क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैनाने 2015 मध्ये प्रियांका चौधरी सोबत लग्न केले. तर प्रियांका रैनापेक्षा 5 महिने आणि 9 दिवसांनी मोठी आहे.