भारताची महिला कुस्तीपटू आणि आता काँग्रेस नेते विनेश फोगाटने भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ज्या पद्धतीच्या मदतीची अपेक्षा होती ती मिळाली नाही असा आरोप विनेश फोगाटने केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला होता अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.
30 वर्षांच्या विनेशने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मजल मारली. पण अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
यानंतर डिप्रेशनमध्ये असलेल्या विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी पी टी उषा विनेशला भेटायला रुग्णालयात गेल्या.
विनेशच्या भेटीचा फोटो पीटी उषा यांनी सोशल मीडियावर शेअर केला. पण आपल्याला न विचारताच पीटी उषा यांनी हा फोटो शेअर केल्याचा आरोप विनेशने केला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत आम्ही तुझ्यासोबत असल्याचं जाला दाखवण्यात आलं. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे असं विनेशने म्हटलं आहे.
आपल्यालाबरोबर राजकारण केलं गेलं असल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे. यामुळेच आपण कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही तीने म्हटलंय.