रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरनंतर आता वाराणसीत नव्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमची उभारणी होणार आहे. या स्टेडिअममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहिला मिळणार आहे.

Sep 22,2023


या स्टेडिअमचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी म्हणजे 23 तारखेला होणार आहे. या स्टेडिअमच्या डिझाईनमध्ये डमरु आणि त्रिशुळाची प्रतिकृती असेल.


भूमीपूजन सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लीटिल मास्टर सुनील गावस्कर उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.


या स्टेडिअममळे पूर्वांचलमधल्या क्रिकेट प्रेमींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत.


या स्टेडिअमसाठी तब्बल 451 कोटी रुपये खर्च येणार आहे. स्टेडिअमचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलंय.


एका अहवालानुसार उत्तर प्रदेश सरकारने जमीन अधिग्रहणासाटी तब्बल 121 कोटी रपुये खर्च केले आहेत. तर बीसीसीआयतर्फे स्टेडिअमसाठी 330 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.


वाराणसीच्या राजाताबाल परिसरातील गंजारी गावात रिंग रोडजवळ हे स्टेडिअम तयार होणार असून स्टेडिअमचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी 30 महिने लागणार आहेत.


भुमीपूजन सोहळ्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाहही उपस्थित राहाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story