केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड फारच वाईट; सिरीज जिंकणं तर अशक्यच बरोबरी साधणंही कठीण!

Dec 30,2023


भारत विरूद्ध साउथ आफ्रिकेचा दुसरा टेस्ट सामना केपटाऊनच्या न्यूलैंड्स क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.या सामन्यात जिंकून भारत आफ्रिकेसोबत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल.


सेंच्युरियनमध्ये खेळल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने रोहितच्या सेनेचा 32 धावांनी पराभव केला.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. भारतीय संघाला हा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.


सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले.

केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा खराब कसोटी रेकॉर्ड

टीम इंडियासाठी हि कसोटी मालिका जिंकण्याची शक्यता कमी आहे, पण केपटाऊनमधील विजय दिलासा देऊ शकतो. मात्र, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना जिंकणे टीम इंडियासाठी खूप कठीण जाणार आहे.


केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा कसोटी रेकॉर्ड खूपच खराब आहे. टीम इंडियाने आतापर्यंत केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत.


केपटाऊनमध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये झालेल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


2 कसोटी सामने ड्रॉ ठेवण्यात भारतीय संघ नक्कीच यशस्वी ठरला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत केपटाऊन येथे खेळवला जाईल.


टीम इंडियाने केपटाऊनमध्ये विजय नोंदवला तर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. 2010-2011च्या दौऱ्यात भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकमेव कसोटी मालिका ड्रॉ ठेवली होती.

VIEW ALL

Read Next Story