या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे एल्बी मॉर्कल. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने 2008 च्या पर्वामध्ये चेन्नईकडून खेळताना डेक्कन चार्जर्सच्या संघाविरुद्ध तब्बल 125 मीटरचा षटकार लगावला होता.
या यादीमध्ये आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे प्रवीण कुमार! 2008 च्या आयपीएलमध्ये बंगळुरुकडून खेळणाऱ्या या तळाच्या फलंदाजाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यामध्ये 124 मीटरचा षटकार लगावला होता.
तिसऱ्या स्थानी गिलक्रिस्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने 2011 च्या पर्वामध्ये बंगळुरुविरुद्ध 122 मीटरचा षटकार मारलेला. पंजाबकडून खेळताना गिलक्रिस्टने ही कामगिरी केलेली.
मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्ये 2010 सालच्या पर्वात उथप्पाने 120 मीटरचा षटकार लगावला होता. या पर्वात तो बंगळुरुकडून खेळत होता. या यादीत उथप्पा चौथ्या स्थानी आहे.
ख्रिस गेल या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुकडून खेळताना 2013 साली ख्रिस गेलने पुण्याविरुद्धच्या सामन्यात 119 मीटरचा षटकार लगावला होता.
या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे युवराज सिंग. चेन्नई विरुद्ध खेळताना 2009 साली युवराजने 119 मीटरचा षटकार लगावला होता. तो त्यावेळी पंजाकडून खेळत होता.
पण या स्पर्धेमध्ये सर्वात दूरपर्यंत षटकार मारणारे अव्वल 6 खेळाडू कोणते आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? या यादीमधील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
आयपीएल म्हणजे धावांचा पाऊस. त्यातही चौकार आणि षटकारांचीही आतिषबाजी या स्पर्धेत पहायला मिळते.