सिमरजीत सिंगने देशांतर्गत दिल्लीसाठी खेळत विजय मिळवून दिला होता. गेल्या वर्षी सहा सामने खेळलेल्या सिमरजीत सिंगने 7.66 च्या इकॉनॉमीने चार विकेट्स घेतल्या होत्या. (फोटो - BCCI)
नवोदित फिरकीपटू प्रशांत सोळंकी रवींद्र जडेजाच्या मदतीसाठी चेन्नईच्या संघासह मैदानात उतरणार आहे. या 23 वर्षीय खेळाडूने देशांतर्गत पाच टी-20 सामने खेळले आहेत. (Prashant Solanki/Instagram)
गेल्या वर्षी दीपक चहर पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे संघाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता चेन्नईची गोलंदाजी लाइन-अप मजबूत करण्यासाठी तो संघात परतला आहे. (फोटो - PTI)
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसचा गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे या मोसमात स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी या बॉलरवर असणार आहे. (फोटो - AFP)
चेन्नईच्या संघाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी रवींद्र जडेजा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. 34 वर्षीय जडेजा गेल्या वर्षी काही प्रभाव पाडू शकला नव्हता. मात्र आता सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. (फोटो - PTI)
आयपीएल 2023 च्या लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सवरही सर्वांची नजर असणार आहे. अष्टपैलू असलेल्या बेन स्टोक्सकडून सीएसकेच्या संघाला खूप अपेक्षा आहेत. (फोटो - PTI)
अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अंबती रायडूने चेन्नईसाठी आपली ताकद दाखवली आहे. मात्र, गेल्या काही हंगामात तो शांत होता. पण आता पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची संधी त्याच्याकडे उपलब्ध आहे. (फोटो - PTI)
अनेक वर्षांपासून चेन्नईसोबत असलेल्या मोईन अलीने गेल्या दोन मोसमांत दमदार कामगिरी केली आहे. मोईन अलीने 25 सामन्यांमध्ये 137.52 च्या स्ट्राइक रेटने 601 धावा केल्या आहेत. (फोटो - PTI)
चेन्नईसाठी न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. कॉनवेने 7 सामन्यांत 145.66 च्या स्ट्राइक रेटने 252 धावा केल्या आहेत. (फोटो - PTI)
दमदार सुरुवात करण्यासाठी चेन्नई ऋतुराज गायकवाडवर अवलंबून आहे. गेल्या दोन मोसमात ऋतुराजने तुफान फलंदाजी केली होती. 2021च्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 635 धावा केल्या होत्या. (फोटो - PTI)
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सरावादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र आता तो तंदुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो - PTI)