दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाला लॉटरी लागली आहे. मफाका थेट आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे.

क्वेना मफाका मुंबई इंडियन्समध्ये दिलशान मधुशंकाच्या जागी खेळेल. मधुशंका दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत क्वेना मफाफाने दमदार कामगिरी केली होती. अवघ्या 6 सामन्यात त्याने 21 विकेट घेतल्या.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये छाप उमटवल्यानंतर मफाकाने आपण जसप्रीत बुमराहपेक्षा चांगला गोलंदाज असल्याचं वक्तव्य केलं होतं.

मफाका वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच जसप्रीत बुमराहसारखा यॉर्कर टाकण्यात तो तरबेज आहे.

क्वेना मफाकाचं वय अवघं 17 वर्ष आहे. तो बारावीत शिकतो. पण वेगाच्या जोरावत तो थेट जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालाय.

मफाकाबरोबरच गुजरात टायन्समध्येही एका वेगवान गोलंदाजाचा समावेश झालाय. गुजरात संघात आता मोहम्मद शमीच्या जागी संदीप वॉरियर खेळताना दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story