CSK च्या संघातील बांगलादेशी गोलंदाजाची जर्सी इतर 10 खेळाडूंहून एकदमच हटके; जाणून घ्या खास कारण

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 च्या पर्वातील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

पहिल्या सामन्यात मोठा विजय

चन्नईच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बंगळुरुच्या संघाला पराभूत करत सामना 6 विकेट्स आणि 8 बॉल राखून जिंकला.

दुसरा सामनाही जिंकला

दुसऱ्या सामन्यामध्ये चेन्नईने गुजरात जायंट्सला 63 धावांनी धूळ चारली.

विजयामध्ये मोठा वाटा

पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईला विजय मिळवून देण्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने मोलाची कामगिरी केली.

पहिल्या सामन्यात 4 विकेट्स

पहिल्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन मुस्तफिजुर रहमानने 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यातही तो चमकला.

दुसऱ्या सामन्यातही उत्तम कामगिरी

दुसऱ्या सामन्यात मुस्तफिजुरने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत 2 गडी तंबुत पाठवले. या कामगिरीसाठी रेहमानवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

विशेष जर्सी

मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यंदाच्या पर्वात केवळ मुस्ताफिजुर रेहमानसाठी चेन्नईने विशेष जर्सी तयार केली आहे.

वेगळी जर्सी

बंगळुरुविरुबरोबरच गुजरातविरुद्धच्या सामन्यांमध्ये मुस्तफिजुरची सीएसकेची जर्सी ही इतर खेळाडूंपेक्षा वेगळी होती. यामागे एक खास कारण आहे

सर्वांच्या जर्सीवर दिसते ती जाहिरात

चेन्नईच्या संघाच्या खेळाडूंना दिलेल्या जर्सीच्या उजव्या बाहीवर एका मद्य कंपनीची जाहिरात आहे. सर्वच खेळाडूंच्या जर्सीवर ही जाहिरात दिसून आली. याला एकमेव अपवाद ठरला मुस्तफिजुर रहमान.

मद्य निषिद्ध

मुस्तफिजुर रहमान हा मुस्लीम आहे. मुस्लिमांमध्ये मद्य सेवन करणे किंवा मद्यपानाला प्रोत्साहन देणं निषिद्ध मानलं जातं.

त्यामुळेच मुस्तफिजुर रहमानच्या जर्सीवर मद्य कंपनीची जाहिरात दिसत नाही. पुढील सामन्यात तुम्ही याची खात्री करुन घेऊ शकता.

यापूर्वीही मुस्लिम खेळाडूसाठी थांबवलं सेलिब्रेशन

यापूर्वीही अनेकदा मुस्लीम खेळाडूंना मद्यासंदर्भातील धोरणांमुळे विशेष वागणूक दिल्याचं दिसत. उस्मान ख्वाजाला वर्ल्ड टेस्ट सिरिजचं जेतेपद सेलिब्रेट करता यावं म्हणून पॅट कमिन्सने संघ सहकाऱ्यांना शॅम्पेन उडवण्यापासून रोखल्याचं पाहायला मिळालं होतं.

VIEW ALL

Read Next Story