मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या मथीशा पाथिरानाने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
मथीशा पाथिराना हा त्याच्या कामागिरीबरोबरच विकेट घेतल्यानंतर डोळे अर्धवट बंद करुन उभं राहण्यासाठीच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहे.
मथीशा पाथिरानाच्या या सेलिब्रेशनचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचं उत्तर मथीशा पाथिरानाने दिलं आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर शिवम दुबेशी बोलताना मथीशा पाथिरानाने हे सेलिब्रेशन त्याने कोणापासून प्रेरणा घेत करतो आहे हे सांगितलं.
विकेट घेतल्यानंतर मथीशा पाथिराना डोळे अर्धवट बंद करुन हाताची बोटं एकमेकांमध्ये अडकवून उभा राहत सेलिब्रेशन करतो. या सेलिब्रेशनमागील प्रेरणा एका फुटबॉलपटू असल्याचं मथीशा पाथिराना सांगतो.
"नाही ते सेलिब्रेशन अंडरटेकरपासून प्रेरणा घेऊन सुचलेलं नाही. मी क्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता आहे. मी त्याचं सेलिब्रेशन कॉपी करण्याचा प्रयत्न करतो," असं मथीशा पाथिरानाने सांगितलं.
"मात्र हे सेलिब्रेशन करताना मी डोळे पूर्ण बंद करत नाही," असं मथीशा पाथिरानाने शिवम दुबेला सांगितलं. या सेलिब्रेशनमागे आपल्या आवडत्या फुटबॉल स्टारला फॉलो करण्याचा मथीशाचा हेतू असतो.
यंदाच्या पर्वातील पहिल्या 30 सामन्यानंतर मथीशा पाथिराना हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.