आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. पण असेही काही खेळा़डू आहेत, ज्यांना अद्याप संधीच मिळालेली नाही.

जवळपास सर्वच संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर बोली लावलीय पण एकदाही खेळवण्यात आलेलंन नाही किंवा एक सामना खेळवलाय.

यात पहिला नंबर आहे तो दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज राइली रुसोचा पंजाब किंग्सने रुसोला 8 कोटींना खरेदी केली. पण अद्याप तो एकही सामना खेळला नाही.

गुजरात टायटन्सने शाहरुख खानवर 7.40 कोटी रुपयांची बोली लावली. पण इतक्या महागड्या खेळाडूला केवळ एका सामन्यात खेळवण्यात आलं. यात त्याने 14 धावा केल्या.

युवा विकेटकिपर-फलंदाज कुमार कुशाग्रसाठी दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपये मोजले. पण दिल्लीने त्याला मैदानातच उतरवलेलं नाही

वेस्टइंडिजच्या रोवमन पॉवेलवरही आयपीएलमध्ये पैशांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्सने पॉवेलसाठी 7.40 कोटी रुपये मोजले. पण आतापर्यंत तो केवळ एकच सामना खेळलाय.

इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीवर 8 कोटी रुपयांची बोली लावत चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या संघात घेतलं. पण यंदाच्या हंगामात तो केवळ एक सामना खेळलाय.

VIEW ALL

Read Next Story