यंदाच्या आयपीएल हंगामात सुपर फ्लॉप गोलंदाजांमध्ये पहिलं नाव आहे ते भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनचं, अश्विनला 6 सामन्यात केवळ 1 विकेट घेता आलीय.
ऑस्ट्रेलियाच स्टार गोलंदाज मिचेल मार्श आयपीएलमध्ये मात्र फ्लॉप ठऱतोय. मार्शने तीन सामन्यात केवळ एक विकेट घेतलीय.
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस फलंदाजी आणि गोलंदाजीतही फ्लॉप ठरलाय. तीन सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्यात
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत या हंगामात काहीच चांगलच घडत नाहीए. हार्दिक पांड्याला आतापर्यंत केवळ 4 विकेट घेता आल्यात.
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यंदाच्या आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करु शकलेला नाही. जडेजाने सात सामन्यात चार विकेट घेतल्यात.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीन आयपीएल 2024 मध्ये फ्लॉप ठरतोय. सहा सामन्यात त्याने केवळ 4 विकेट घेतल्यात.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोहम्मद सिराजची जादू गायबच झालीय. सिराजने सात सामन्यात 5 विकेट घेतल्यात. पण यासाठी त्याने खोऱ्याने धावा दिल्यात.
आयपीएल 2024 चा सर्वात महागडा खेळाडू असलेल्या मिचेल स्टार्कचीही चांगलीच धुलाई झाली आहे. स्टार्कने सात सामन्यात 6 विकेट घेतल्यात.