आयपीएल 2024 च्या रणसंग्रामाला 22 मार्चपासून सुरूवात झालीये, आणि या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 24 सामने खेळले गेले आहेत.
आयपीएल ही क्रिकेट जगामधील सर्वात महागडी लीग असून, आयपीएलने अनेक प्रसिद्ध फूटबॉल लिग्सना सुद्धा मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंचा लिलाव होऊन त्यांच्यावर महागड्या बोली लागते.
पण आयपीएलची अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेळाडूंसोबत, प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला पण या लिगमध्ये चांगली रक्कम मिळते.
अनेक रिपोर्ट्सनुसार असे सांगितले आहे की, चियरलिडर्सला एका सामन्याचे प्रत्येकी 12 ते 17 हजार रूपये मिळतात.
तर, ही रक्कम प्रत्येक टीमच्या चियरलिडर्सप्रमाणे बदलत जाते. जसे की, चेन्नई, पंजाब, हैदराबादचे संघ, चियरलिडर्सला एका सामन्याचे 12 हजार रूपये देतात.
याव्यतिरिक्त, मुंबई, बंगळुरू सारखे मोठे संघ चियरलिडर्सला एका सामन्याचे तब्बल 20 हजार रूपये देतात.
तर, काही रिपोर्ट्समध्ये असं पण सांगितले आहे की, काही संघ चियरलिडर्सला एका सामन्याचे 24 हजार रूपये सुद्धा देतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे, एका मॅचच्या पगाराव्यतीरिक्त चियरलिडर्सला राहण्याची आणि खाण्याची सुविधा सुद्धा मोफत मिळते.