कोलकाताने आयपीएलमधल्या दुसऱ्या सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. 7 विकेट गमावत कोलकाताने 272 धावा केल्या.
केकेआरचा आक्रमक फलंदाज सुनील नरेनने अवघ्या 39 चेंडूत 85 धावा केल्या. तर आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीने 54 धावांची खेळी केली.
कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टनमच्या मैदानात तब्बल 18 षटकार आणि 22 चौकारांची बरसात केली.
सुनील नरेन आणि रघुवंशी यांच्याबरोबर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगनेही तुफान फकेबाजी केली. रसेलने 19 चेंडूत 41 धावा केल्या. रिंकूने 8 चेंडूत 26 धावा ठोकल्या.
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची तुफानी खेळी संघाचा मालक शाहरुख खान एन्जॉय करताना दिसला. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुनील नरेन, रघुवंधी, रसेल आणि रिंकू सिंगच्या फटेकाबाजीला शाहरखने उभं राहून दाद दिली.