भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि युवा खेळाडूंचा आयकॉन महेंद्र सिंग धोणीचे करोडो चाहते आहेत.
कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर महेंद्र सिंग धोणीने भारतीय क्रिकेट इतिहासात स्वत:ची जागा बनवली आहे.
पण जुने दिवस आणि जुने मित्र धोणी आजही विसरलेला नाही. सध्या सोशल मीडियावर धोणीच्या जुन्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.
भारतासाठी खेळायला लागल्यावर धोणी आणि त्याच्या कुटुंबियांना रांचीत 1200 स्क्वेअर फूटचं राहाण्यासाठी देण्यात आलं होतं.
क्वार्टर नंबर E-25 असं या घराचा नंबर आहे. धोणीवर बनलेल्या 'एमएस धोणी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाली काही दृष्य या घरात चित्रीत करण्यात आलीत.
अधिकारी वर्गासाठी हे क्वार्टर दिले जातात. या घरात दोन बेडरुम आणि हॉल आहे. शिवाय घराबाहेर सुंदर असं गार्डन बनवण्यात आलंय.
हे घर आता दुसऱ्या अधिकाऱ्याला देण्यात आलं आहे. पण इथल्या आठवणी आजही धोणीसाठी ताज्या आहेत.