आयपीएलच्या सतराव्या हंगामाची मेगाफायनल आता काही तासांवर येऊन ठेपलीय. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदाराबाद आमने सामने असणार आहेत.

आयपीएलची मेगाफायनल 26 मे रोजी चेन्नईत संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. त्यााधी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने झक्कास फोटोशुट केलं. (फोटो कर्टसी - इंडियन प्रीमिअर लीग)

श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्सने आयपीलच्या ट्रॉफीसह विविध पोजेस दिल्या आहे. आयपीएलच्या अधिकृत एक्स हँडलवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (फोटो कर्टसी - इंडियन प्रीमिअर लीग)

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत दोनदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तर सनरायजर्स हैदराबादने एकदा आयपीएलची ट्ऱॉफी आपल्या नावावर केलीय. (फोटो कर्टसी - इंडियन प्रीमिअर लीग)

कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 वेळा आमने सामने आलेत. यात कोलकाताने 18 वेळा बाजी मारलीय. तर हैदराबादला 9 वेळा जिंकता आलं आहे. (फोटो कर्टसी - इंडियन प्रीमिअर लीग)

कोलकाताविरुद्ध हैदरबादची सर्वोत्तम धावसंख्या 228 आहे. तर हैदराबादविरुद्ध कोलकाताची 208 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आयपीएलमध्ये सर्वात महागडे ठरलेले दोन खेळाडू या सामन्या आमने सामने असणार आहेत. कोलकाताने मिशेल स्टार्कसाठी 24 कोटी मोजलेत. तर हैदराबादने पॅट कमिन्सवर 20 कोटींची बोली लावली होती.

VIEW ALL

Read Next Story