पण आता विराट कोहली आणि आरसीबीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. विराट कोहली लवकरच मैदानावर उतरणर आहे.
तब्बल 60 दिवसांनंतर विराट कोहली बॅट उचलणार आहे. आयपीएल 2024 साठी विराटा कोहली आपल्या आरसीबी संघारोबर सराव करताना दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली 17 मार्चला आरसीबी संघाच्या सराव शिबिरात सामील होईल. विरोट कोहली सध्या लंडनमध्ये आहे.
विराट कोहलीची पत्नी आणि अभनेत्री अनुष्का शर्माने दुसऱ्यांदा आई झाली असून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं आहे.
मुलाच्या जन्मामुळे विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला होता. 17 जानेवारीला विराट अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळताना दिसला होता.
आता तब्बल 60 दिवसांनी विराट मैदानावर पतरणार आहे. 12 मार्च 2024 ला विराट आरसीबीमध्ये सहभागी होऊन 16 वर्ष पूर्ण झाली. आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळणार आहे.