WI vs IND: वेस्ट इंडिज सिरीजमध्ये इशांत शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; करणार 'हे' काम!

Published by: Zee Team | Jul 09, 2023

इशांत शर्मावर मोठी जबाबदारी

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर अचानक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

विशेष काम करणार

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो विशेष काम करताना दिसणार आहे. इशांत बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

वेस्ट इंडिजविरुद्ध संधी नाही

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र इशांत शर्माला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इशांत आता दिसेनासा झालाय.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

वेस्ट इंडिज सिरीजमध्ये दिसणार

इशांत भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता तो वेस्ट इंडिज सिरीजमध्ये दिसणार आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

समालोचकाची जबाबदारी

वेस्ट इंडिजविरुद्ध 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत इशांतकडे समालोचकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

अद्याप निवृत्ती नाही

अद्याप निवृत्ती जाहीर केली नसली तरी इशांत समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2023

VIEW ALL

Read Next Story