IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलवर नाव कोरलंय. मात्र, केकेआरला ट्रॉफी जिंकून देऊन देखील गौतम गंभीर समाधानी नसल्याचं दिसतंय.

अजून 3 ट्रॉफीची गरज

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

आम्ही मागे 2 ट्रॉफी

आम्ही तिसऱ्यांदा जिंकलो, पण आम्ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या मागे 2 ट्रॉफी आहोत, असं गंभीर म्हणतो.

प्रवास सुरू झालाय

सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठीचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, असा विश्वास गौतम गंभीरने दाखवला.

सर्वात यशस्वी संघ

केकेआरला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनवणं हे पुढील ध्येय आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा नसेल, असं गंभीरने म्हटलंय.

मेहनत

आम्हाला आणखी तीन आयपीएल ट्रॉफी जिंकायच्या असतील तर आम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागेल, असंही गौतमने गंभीर मुद्रभावनेने म्हटलं आहे.

बीसीसीआयची ऑफर धुडकावली?

दरम्यान, गौतम गंभीरच्या वक्तव्यामुळे आता चर्चा सुरू झालीये. गंभीरने बीसीसीआयची ऑफर धुडकावून लावली नाही ना? असा सवाल विचारला जातोय.

VIEW ALL

Read Next Story