World Cup साठी ऋषभ पंत सज्ज

Video शेअर करत दिले 'हे' संकेत

ऋषभ पंत

गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत संघाबाहेर आहे.

फिटनेसबाबत अपडेट

अशातच ऋषभ पंतने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट दिले आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी

बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेला पंत चांगल्या गतीने सराव करताना दिसला.

सरावाचा व्हिडीओ

एका गडद बोगद्याच्या शेवटी तो थोडासा प्रकाश दिसत आहे, असं पंतने कॅप्शनमध्ये लिहिलंय. सरावाचा व्हिडीओ पंतने शेअर केला आहे.

वेगाने प्रगती

बंगळुरूमध्ये त्याच्या पुनर्वसनात रिषभने चांगली प्रगती केली आहे, त्याच्या दुखापतीची गंभीरता असूनही वेगाने प्रगती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसवलाय.

अपघात

ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडमधील रुरकी या त्याच्या मूळ गावी जाताना त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर अनेक सर्जरी देखील झाल्या.

वर्ल्ड कप

दरम्यान, आगामी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंत खेळेल की नाही? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता ईशान किशनच्या दमदार खेळीमुळे ऋषभला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story