अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेल्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे.
फुटबॉल श्रेत्रातील अनेक तज्ज्ञ आणि चाहते मेस्सी हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे असं मानतात.
मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने 2022 साली वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 1986 नंतर अर्जेंटिनाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.
2023 मध्ये मेस्सीने 1060 कोटी रुपयांचा कमाई केली आहे. यावरुनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज बांधता येईल.
मेस्सीच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसले. मेस्सी 4960 कोटींचा मालक आहे.
मेस्सी हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तो सोशल मीडियावरुन चांगली कमाई करतो.
मेस्सी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पेड पोस्ट करण्यासाठी तब्बल 21.49 कोटी रुपये मानधन घेतो.