पॅरिस ऑलिम्पिकच नाही तर 'या' ठिकाणी देखील मनू भाकरने फडकावलाय तिरंगा

मनू भाकर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कांस्यपदक पटकावून भारताचं पदकांचं खातं उघडलं.

पदकांची कमाई

पण तुम्हाला माहितीये का? मनू भाकरने इतर कोणत्या ठिकाणी पदकांची कमाई केली आहे?

आशियाई गेम्स 2022

मनू भाकरने आशियाई गेम्स 2022 मध्ये 25 मीटर पिस्तूल संघात सुवर्णपदक पटकावलं होतं.

वर्ल्ड चॅम्पियनशीप 2023

बाकूच्या वर्ल्ड चॅम्पियनशीप 2023 मध्ये 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत मनू भाकरने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

पदक हुकलं

तसेच चांगवॉन येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये 25 मीटर पिस्तूलमध्ये तीचं पदक हुकलं होतं.

ISSF वर्ल्ड कप

भोपाळमध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत मनू भाकरने 25 मीटर पिस्तुलमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.

वर्ल्ड चॅम्पियनशीप

तसेच 2022 मध्ये कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये देखील मनूने 25 मीटर पिस्तुलमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती.

दोन गोल्ड मेडल

चेंगडूच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मनू भाकरने एक नव्हे तर दोन गोल्ड मेडल पटकावले होते.

VIEW ALL

Read Next Story