मोहम्मद शमीच्या शानदार वेगवान गोलंदाजीने आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सर्वांची मनं जिंकली आहेत.

मोहम्मद शमीला साईन करण्यासाठी आता मोठमोठ्या ब्रँड्समध्ये शर्यत सुरू झाली आहे.

त्‍याच्‍या जबरदस्त कामगिरीमुळे विश्‍वचषक चालू असतानाच त्‍याच्‍या अॅन्डॉर्समेंट फीमध्ये दुपटीने वाढ होऊन रु. 1 कोटी झाली आहे.

शमीच्या गोलंदाजीने अनेक विक्रम मोडले असतानाच आता तो भारतीय क्रिकेटचा नवा पोस्टर बॉयसुद्धा बनला आहे.

विशेषत: न्यूट्रिशन, हेल्थ, शीतपेये, इलेक्ट्रॉनिक्स आणि हेडफोन कंपन्या शमीला त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साइन करण्यास उत्सुक आहेत.

त्याच्या सध्याच्या ब्रँड डीलमध्ये स्पोर्ट्सवेअर फर्म PUMA,हेल एनर्जी ड्रिंक आणि व्हिजन 11 फॅन्टसी अॅपचा समावेश आहे.

या विश्वचषकात, शमीने सहा सामन्यांत २३ बळी घेतले आहेत, त्यात तीन विकेट्सचा समावेश आहे.

तसेच विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाजही शमी ठरला.

VIEW ALL

Read Next Story