5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडेल असं म्हटलं जात आहे.
मात्र सध्या सक्रीय असलेले आणि एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? याच खेळाडूंची यादी पाहूयात...
सध्या सक्रीय असलेला आणि एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रुट चौथ्या स्थानी आहे.
जो रुटने एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये एकूण 3 शतकं झळकावली आहेत.
सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा एक असा खेळाडू तिसऱ्या क्रमाकांवर आहे जो यंदा वर्ल्डकप खेळत नाहीय.
या खेळाडूचं नाव आहे शिखर धवन.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये धवनच्या नावे एकूण 3 शतकं आहेत.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आहे.
भारतात प्रचंड चाहतावर्ग असलेल्या डेव्हीड वॉर्नरच्या नावावर एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये एकूण 4 शतकं आहेत.
एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जास्त शतकं झळकावणाऱ्या आणि सध्या सक्रीय असलेल्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय खेळाडूच आहे.
या खेळाडूचं नाव आहे रोहित शर्मा. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये रोहितने एकूण 6 शतकं झळकावली आहेत.