इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 5 खेळाडू रिटेन केले आहेत.
मुंबईने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माचा समावेश आहे. यांना रिटेन केल्यावर मुंबई फ्रेंचायझीकडे अवघे 45 कोटी रुपये शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स ऑक्शनमध्ये 5 माजी खेळाडूंवर बोली लावू शकते.
साऊथ आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकवर मुंबई इंडियन्स मोठी बोली लावू शकते. मागील 3 वर्ष क्विंटन डी कॉक लखनऊकडून आयपीएलमध्ये खेळत होता. यापूर्वी क्विंटन डी कॉक हा मुंबई इंडियन्समध्ये असताना रोहित शर्मासोबत सलामी फलंदाज म्हणून काम करायचा.
आयपीएल 2024 मध्ये राजस्थानकडून खेळताना फलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या जोश बटलर यंदा मेगा ऑक्शनमध्ये दिसणार आहे. कधीकाळी MI साठी खेळलेल्या बटलरवर मोठी बोली लावू शकते.
पंड्या ब्रदर्सपैकी एक ऑल राउंडर कृणालवर मुंबई इंडियन्स बोली लावू शकते. आयपीएल 2021 पर्यंत कृणाल हा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू होता.
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्ससाठी व्हॅल्यू एडिशन ठरू शकतो. ट्रेंट बोल्ट हा सुद्धा मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू राहिलेला आहे.
फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स ऑक्शनमध्ये मोठी बोली लावू शकते. 2011 मध्ये चहलने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.