वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!
यंदाचा वर्ल्ड कप हा भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आयसीसीच्या या मेगा स्पर्धेत टीम इंडियासाठी कोणता फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.
येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. अशातच आता रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय.
2019 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर एकूण आठ फलंदाजांना संधी दिली होती. मात्र, युवराजनंतर अद्याप टीम इंडियाला योग्य फलंदाज मिळाला नाही.
टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये फक्त एकच फलंदाज चौथ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याचं नाव सूर्यकुमार यादव.
सूर्यकुमार यादव सात्त्याने वनडे क्रिकेटमध्ये फेल होतोय. त्यामुळे आता त्याला संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दोन्ही खेळाडू अनफीट असल्याने आता सूर्यकुमारला टीम इंडियामध्ये जागा मिळणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.