"कोणी मला आई-बहिणीवरुन बोललं तर..."; यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला

अजिंक्य रहाणेनं केलेल्या त्या हकालपट्टीवर यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच झाला व्यक्त; पाहूयात तो काय म्हणाला...

Swapnil Ghangale
Jul 04,2023

अनेकांचं लक्ष वेधून घेतलं

इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या पर्वामध्ये दमदार कामगिरीमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल!

स्लेजिंगसंदर्भात बोलला

यशस्वी जयस्वालने मैदानावर होणाऱ्या स्लेजिंगसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.

आक्रमकतेबद्दल उघडपणे मांडलं मत

यशस्वीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मैदानावरील आक्रमकतेबद्दल आपली भूमिका मांडली आहे. 'लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत यशस्वीने ही भूमिका मांडली.

आक्रमकता महत्त्वाची

"मैदानावरील आक्रमकता महत्त्वाची आहे. मी मानसिक स्तरावर नैसर्गिकपणे आक्रमक आहे," असं यशस्वीने सांगितलं. यशस्वीला आक्रमकतेमुळे झालेल्या एका बाचबाचीवरुन थेट मैदानाबाहेर जावं लागलं होतं.

हे सर्वांबरोबर होतं

सामन्यादरम्यान एकमेकांबद्दल अपशब्द वापरले जातात, स्लेजिंग केली जाते याबद्दल बोलताना यशस्वीने, 'हे सर्वांबरोबरच होतं,' असं म्हटलंय.

सार्वजनिकपणे बोललं जात नाही

"स्लेजिंग सर्वांबरोबरच होत असलं तरी त्याबद्दल सार्वजनिकपणे बोललं जात नाही. अर्थात हे कोण काय बोलतं त्यावर अवलंबून असतं," असं यशस्वीने सांगितलं.

कोणी मला आई-बहिणीवरुन बोललं तर...

"कोणी मला आई-बहिणीवरुन बोललं तर मी शांत राहणार नाही," असं यशस्वीने म्हटलं आहे.

ती बाचबाची अन् वाद

2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात दुलीप चषकाच्या एका सामन्यादरम्यान यशस्वी आणि विरोधी संघातील एका खेळाडूमध्ये बाचबाची झाली होती.

अजिंक्यने प्रयत्न केला पण...

या बाचाबाचीनंतर पश्चिम झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं यशस्वीला थांबवण्याचा प्रयत्न केला.

थेट मैदानाबाहेर काढलं

मात्र अजिंक्यने अनेकदा सांगूनही यशस्वी शांत न झाल्याने अजिंक्यने त्याला थेट मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं होतं.

VIEW ALL

Read Next Story