२४ आणि २५ नोव्हेंबर हे दोन दिवस आयपीएल मेगा लिलाव 2025 जेद्दाह, सौदी अरेबिया इथे झाला.
लिलावादरम्यान एकूण 182 खेळाडूंची विक्री झाली. या खेळाडूंवर ६३९.१५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
सध्याच्या IPL चॅम्पियन KKR ने अनेक खेळाडूंसाठी आपला खजिना खुला केला आहे. पण नितीश यांनी राणाला विकत घेतले नाही.
IPL लिलावात KKR ने न विकत घेतल्याने नितीशची पत्नी साची मारवाह खूपच संतापलेली दिसली आणि तिने आपला रागही दाखवला.
नितीश राणाची पत्नी साची यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिली आहे.
'वफादारी महाग असते, प्रत्येकजण ती हाताळू शकत नाही.' अशी साचीने लिहली आहे.
नितीश राणा गेल्या 7 वर्षांपासून KKR संघाचा भाग होता. पण KKRने त्याला या वेळी लिलावात रिटेन केले नाही किंवा त्याला विकतही घेतले नाही.
नितीश राणाला KKR घेतले नाही यावरून साचीचा राग स्पष्ट दिसत होता. नितीश राणाची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती.
यंदा राजस्थान रॉयल्सने राणाला 4.20 कोटी रुपयांना खरेदी केले.