5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत दहा संघांमध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेसाठी ऑनलाईन तिकिटविक्री करण्यात आली. यात भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिट काही मिनिटांतच विकली गेली. लाखो रुपयांपर्यंत या तिकिटांची किंमत गेली होती.

विश्वचषक सामन्याची तिकिटं ज्यांना मिळालीत ते खुश आहेत, तर ज्यांनी तिकिंट मिळाली नाही ते नाराज झालेत. अशात मोफत तिकिटांचा स्कॅम समोर आला आहे.

भारतात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. त्यात विश्वचषक भारतात होत असल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. नेमका याच संधीचा फायदा काही स्कॅमर्स घेत आहे.

विश्वचषक स्पर्धेचा फायदा घेत स्कॅमर्सकडून लोकांना मोफत तिकिटांचं आमिष दाखवणारे मेसेज पाठवले जात आहेत.

कॉम्प्युटर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म McAfee ने अशा ऑनलाईन स्कॅमपासून दूर राहाण्याचं आवाहन केलं आहे. ही एक सायबर गुन्हेगारीची पद्धत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सायबर गुन्हेगारांकडून तिकिट बुकिंग, तिकिटांवर डिस्काऊंट, मोफत तिकिटं आणि तिकिटं डाऊनलोडच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे.

McAfee ने दिलेल्या माहितीनुसार विश्वचषकाची क्रेझ पाहाता बोगस कॉन्सर्टचाही समावेश असू शकतो. या लिंक उघडल्यास तुमचां बँक अकाऊंट रिकामं होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

विश्वचषकाचे सामने भारतातल्या वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. अशात लकी विनरच्या नावाखाली मोफत तिकिटांबरोबरच मोफत प्रवासाची प्रलोभनंसुद्ध दिली जाऊ शकतात.

विश्वचषकाच्या निमित्ताने अनेक युजर्स व्हिडिओ डाऊनलोड करतात. याचा फायदा घेत स्कॅमर्स बोगस साईट उघडून व्हिडिओ डाऊनलोडची सुविधा असल्याचं सांगत तुमच्या संगनकात स्पाय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story