वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ त्यांच्या खराब खेळामुळे आता संघर्ष करताना दिसत आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या फील्डर्सकडून निकृष्ट दर्जाची फिल्डिंग केली गेली आहे.
खेळाडू अनफिट असल्यामुळे त्यांच्याकडून चांगले प्रदर्शन केले जात नाहीये.
पाकिस्तानचा बांग्लादेशविरुद्ध कोलकत्ता येथे खेळवल्या जाण्याऱ्या सामन्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूंनी एक अजब गोष्ट केली.
खेळाडूंनी हॉटेल मधील उपलब्ध असलेले जेवण जेवण्यास नकार दिला.
रीपोर्ट्नुसार हॉटेलच्या मेन्यूमध्ये बिर्याणी नसल्याने खेळाडूंनी जेवण्यास नकार दिला.
पाकिस्तानी टीमच्या खेळाडूंनी एका अॅपद्वारे बिर्याणी मागवून खाल्ली.
मीडिया रीपोर्ट्नुसार खेळाडूंनी चाप, फिरनी, कबाब, शाही तुकडा आणि बिर्याणी असे पदार्थ मागवले.
महत्वाची बाब म्हणजे हे सर्व पदार्थ शरीराला अनफिट बनवतात.
फिटनेसमुळे स्पर्धेत एवढा संघर्ष करायला लागत असूनही खेळाडू त्यांच्या जिभेचे चोचले काही कमी करताना दिसत नाहीयेत.
याआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमने या संघाला त्यांच्या फिटनेसवरुन 'हे खेळाडू दररोज 8 किलो मटण खात असावेत असा यांचा फिटनेस आहे' म्हणत खडे बोल लगावले होते.