पॅरिस ऑलिम्पिकचा बारावा दिवस भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि करोडो भारतीयांसाठी धक्कादायक ठरला. विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं.
50 किलो वजनी गटात विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम फेरीआधी झालेल्या चाचणीत तिचं वजन 100 ग्राम जास्त भरलं.
विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर पडली असली तरी करोडो भारतीयांची मनं तिने जिंकली आहे. विनेशच्या मेहनतीमागे तिच्या पतीचा मोलाचा वाटा आहे.
विनेश फोगाटच्या पतीचं नाव सोमवीर राठी आहे, सोमवीरही कुस्तीपटू होता. आता तो भारतीय रेल्वेत नोकरीला आहे.
विनेशही भारतीय रेल्वेत नकोरी करते. भारतीय रेल्वेत असतानाच विनेश आणि सोमवीरची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
2018 मध्ये विनेश जकार्ता एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून आली. दिल्ली विमानतळावरच सोमवीरने तिला लग्नासाठी प्रपोज केलं.
यानंतर विनेश आणि सोमवीरने 13 डिसेंबर 2018 मध्ये लग्न केलं. लग्नात दोघांनी सात फेऱ्यांऐवजी आठ फेरे घेतले. आठवी फेरी बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ मोहिमेसाठी समर्पित होती.