तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल सचिन, विराट किंवा धोनी यांच्यापेक्षाही श्रीमंत क्रिकेटपटू भारतात आहे. या क्रिकेटरची एकूण संपत्ती तब्बल 20 हजार कोटी इतकी आहे.

Nov 19,2023


भारतातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूचं नाव आहे समरजीतसिंह रणजीतसिंह गायकवाड. समरजीत सिंह गायकवाड हे बडोद्यातल्या शाही कुटुंबातले आहेत.


समरजीत सिंह बडोदासाठी प्रथम श्रेणीसाठी क्रिकेट खेळलेत. याशिवाय त्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट प्रशासक म्हणूनही काम पाहिलंय.


1987 ते 1989 दरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत समरजीत सिंह यांनी बडोदासाठी 6 सामने खेळले, यात त्यांनी 119 धावा केल्या


समरजीत सिंह गायकवाड गुजरातच्या बडोदातल्या राजघराण्यातले आहेत. रणजीत सिंह गायकवाड आणि शुभांगिनीराजे यांचे ते एकुलते एक पूत्र आहेत.


रणजीत सिंह गायकवडा यांच्या मृत्यूनंतर समरजीत सिंह यांच्याकडे राजघराण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. वारसात 20 कोटीची संपत्ती त्यांच्या नावावर झालीय.


समरजीत सिंह गायकवाड जगातील सर्वात मोठ्या म्हणजे 170 खोल्यांच्या लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक आहेत.

VIEW ALL

Read Next Story