नुकतंच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली. या सिरीजमध्ये 2-1 असा विजय मिळवला आहे.
वर्ल्डकपच्या तोंडावर ही सिरीज खूप महत्त्वाची मानली जात होती.
दरम्यान या सिरीजच्या तिसऱ्या सामन्यानंतर रोहित शर्माला मोठा धक्का बसलाय.
राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माचा आयफोन चोरीला गेल्याची बातमी आहे.
मायखेलच्या वृत्तानुसार, सामन्यापूर्वीच हिटमॅनचा फोन चोरी झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा जेव्हा नेट्समध्ये प्रॅक्टिस करत होता, त्यावेळी त्याचा फोन चोरीला गेला.
मात्र कर्णधार रोहित शर्माने याबाबत कोणतंही अधिकृत विधान दिलं नाही.