Rohit Sharmaच्या पत्नीचा वाढदिवस आणि Mumbai Indians ची 'ती' कमेंट

रोहित शर्माचे चाहते नाराज

रोहित शर्माला जेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरून काढून टाकलंय तेव्हापासून चाहते अतिशय नाराज झाले आहेत.

पु्न्हा भडकले फॅन्स

रोहित शर्माला जवळपास कॅप्टन पदावरून काढून एक आठवडा झालाय. मात्र अजून त्याच्या चाहत्यांचा राग काही शमलेला नाही. त्यात MI ने केलेली ही कृती अजून भडकवणारी आहे.

आता भडकण्याच कारण काय

21 डिसेंबर रोजी रोहित शर्माची पत्नी रितिका शर्माचा जन्मदिवस. या दिवशी मुंबई इंडियन्सने रितिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. यामुळे चाहते नाराज झाले असून टीमला ट्रोल केलं जात आहे.

रितिका रोहितची सपोर्ट सिस्टम

रोहित शर्माच्या करिअरमध्ये त्याची पत्नी रितिका एक सपोर्ट सिस्टमप्रमाणे आहे. रितिकाची साथ त्याच्यासाठी कायमच महत्त्वाची ठरली आहे.

रोहित शर्माची खास पोस्ट

रोहितने त्याच्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये रोहितने त्याच्या पत्नीसाठी 'तुझ्या आयुष्यातील एक खास क्षण साजरा करण्याचे अजून एक कारण' वाढदिवसाच्या शुभेच्छा Rits असे लिहले आहे.

आता ही जबाबदारी सांभाळणार

आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन राहिलेला नाही. मात्र त्याची टिममध्ये महत्त्वाची भूमिका आहे. तो सिनियर खेळाडूसोबतच टीमचा ओपनर असणार आहे.

हार्दिक आहे कॅप्टन

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन पदाची जबाबदारी दिली आहे. पांड्याला गुजरातमधून ट्रेड केलं आहे.

साऊथ आफ्रिकेत रोहित?

पत्नी रितिका शर्माच्या वाढदिवसादिवशी रोहित शर्मा साऊथ आफ्रिकेत आहे. 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरिज सुरु होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story