8 कोटी किंमत, 56 लाखांची स्टॅम्प ड्युटी, खासगी जीम अन्... ऋतुराजच्या पुण्यातील घराचे Inside Photos

भन्नाट कामगिरी

ऋतुराज गायकवाड वर्ल्ड कप 2023 नंतर भारतात सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भन्नाट कामगिरी करतोय.

सोशल मीडियामुळे कायमच चर्चेत

ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आहे. हा पुणेकर क्रिकेटपटू सोशल मीडियामुळे कायमच चर्चेत असतो.

सोमेश्वरवाडीमध्ये आहे ऋतुराजचं घर

ऋतुराजने सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यात आलिशान घर खरेदी केलं. इंडेक्सटॅप डॉट कॉमवरील माहितीनुसार, ऋतुराजने सोमेश्वरवाडी येथील अमर लॅण्डमार्क नावाच्या इमारतीत घर घेतलं.

8 कोटी रुपयांना घेतलं घर

प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार ऋतुराजने हे 2,919 स्वेअर फुटांचं घर 8 कोटी रुपयांना विकत घेतलं.

56 लाखांची स्टॅम्प ड्युटी

या आलिशान घरासाठी ऋतुराजने तब्बल 56 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली.

प्रशस्त लिव्हिंग रुम

ऋतुराजच्या घरामध्ये प्रशस्त लिव्हिंग रुम एरिया आहे. ऋतुराजच्या घरी वरचेवर पाहुण्यांचं येणं जाणं असतं. त्यासाठी हा मोठा लिव्हिंग रुम फारच उत्तम आहे.

बेडरुमची झलक

ऋतुराजच्या बेडरुमची झलकही त्याने पोस्ट केलेल्या या फोटोतून दिसते. ब्राईट कलर्सबरोबरच उत्तम रंगसंगती यात वापरली आहे.

सेप्रेट जागा

ऋतुराजने त्याच्या घरामध्ये मनोरंजनाच्या दृष्टीने एक सेप्रेट जागा तयार केली आहे. या ठिकाणी तो निवांतपणे टीव्ही पाहण्याचा आनंद घेतो.

खासगी जीम

या घरामध्ये ऋतुराजची स्वत:ची खासगी जीम आहे. तो या ठिकाणी नियमितपणे व्यायाम करतो.

मोठी बाल्कनी

ऋतुराजच्या घराला एक छान मोठी बाल्कनी आहे. या बाल्कनीमधून शहराचा व्ह्यू दिसतो.

अनेकदा शेअर केले फोटो

अनेकदा ऋतुराजने पत्नीसोबत या बाल्कनीमधील फोटो पोस्ट केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story