SA vs AUS : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडूलकरला 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड!

Published by: Zee Team | Sep 09, 2023

एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वं शतक

सध्या सुरू असलेल्या साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वं शतक साजरं केलं.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

85 चेंडूत शतक

डेव्हिड वॉर्नरने 85 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे त्याचं 5 वं शतक आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

ऐतिहासिक रेकॉर्ड

डेव्हिड वॉर्नरच्या या शतकामुळे सचिन तेंडूलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके

डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरलाय.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

46 वं शतक

सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46 वं शतक ठोकत वॉर्नरने सचिनचा 45 शतकांचा विक्रम मोडला आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

45 शतकाचा विक्रम

सचिन तेंडूलकरच्या नावावर 45 शतकाचा विक्रम होता. तर ख्रिस गेलच्या नावावर 42 शतकाचा रेकॉर्ड होता.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

सनथ जयसूर्या

सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सनथ जयसूर्या तिसऱ्या स्थानी आहे.

Published by: Zee Team | Sep 09, 2023

VIEW ALL

Read Next Story