वनडे क्रिकेट रटाळ वाटतंय? सचिन तेंडुलकरने सांगितला 25-25-25-25 चा फॉर्म्युला!

रटाळ वनडे क्रिकेट

टी-ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यात आता वनडे क्रिकेट रटाळ वाटू लागलंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील कमी होत आहे.

ज्याचा टॉस तोच बॉस

वनडे क्रिकेटमध्ये अनेकदा ज्याचा टॉस तोच बॉस असं समिकरण पहायला मिळतं. मात्र, सचिन तेंडूलकरने यावर एक भन्नाट फॉर्म्युला शोधून काढला आहे.

रंजक वनडे

आपण जर वनडे क्रिकेटमध्ये 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर क्रिकेट अधिक रंजक होऊ शकतं, असं सचिन तेंडूलकर म्हणतो.

25 ओव्हरचे चार डाव

जर 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर कोणा एका संघाला फायदा होणार नाही. पिच आणि टॉसचा फायदा कोणा एका संघाला होणार नाही.

... तोच सामना जिंकणार

जो संघ योग्य रणनितीची आणखी करेल, जो योग्य ठिकाणी योग्य प्लेयर खेळवेल, त्याला सामना जिंकता येईल, असं सचिन तेंडूलकरने म्हटलं आहे.

भन्नाट कल्पना

सध्या टी-ट्वेंटी क्रिकेटची क्रेझ असल्याने वनडे सामना अधिकच रोमांचक होऊ शकतो, अशी भन्नाट कल्पना सचिन तेंडूलकरने मांडली आहे.

रोमांचक कॉम्बिनेशन

दरम्यान, टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेटचं कॉम्बिनेशन खरोखर रोमांचक असणार आहे. कोणत्या डावात कोणाला बॉलिंग देयची अन् कोणता प्लेयर कधी फलंदाजीला येणार? याचा कस देखील अशा सामन्यात लागू शकतो.

VIEW ALL

Read Next Story