बुटांसाठी खास स्पेस, जीम, बाल्कनी अन्... मुंबईकर श्रेयस अय्यरचं 12 कोटींचं आलिशान घर पाहिलं का?

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

भारत फायलनमध्ये

भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायलनमध्ये प्रवेश केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनल

भारताने न्यूझीलंडला सेमी-फायलनमध्ये 70 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा वर्ल्ड कपची फायनल गाठली.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

सेमी-फायलनमध्ये शतकं

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनमध्ये शतकं झळकावली.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

70 बॉलमध्ये 105 धावा

श्रेयस अय्यरने या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करत 70 बॉलमध्ये 105 धावा केल्या.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

8 सिक्स आणि 4 चौकार

अय्यरने या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 4 चौकार लगावले. अय्यरने 64 धावा चौकार-षटकारामधून केल्या.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

विराटचा शेजारी

वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे श्रेयस अय्यर चर्चेत आलेले असतानाच फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की श्रेयस अय्यर हा विराट कोहलीचा शेजारी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

आलिशान 4 BHK

भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा कणा असलेला श्रेयस अय्यर मुंबईमध्ये एका आलिशान 4 BHK घरामध्ये राहतो.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

किंमत 12 कोटी रुपये

मुंबईतील उत्तुंग आणि डिझायनिंगच्या दृष्टीने हटके असलेल्या रहिवाशी इमारतींपैकी एक असलेल्या इमारतीतील घरासाठी श्रेयस अय्यने 12 कोटी रुपये मोजले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

कोणत्या बिल्डींगमध्ये राहतो?

श्रेयस लोअर परळमधील आलीशान लोढा वर्ल्ड या इमारतीमध्ये राहतो. या इमारतीत त्याचा 4 BHK फ्लॅट आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

उत्तम इंटिरीअर

श्रेयसचं हे घर फारच ऐसपैस असून घरामध्ये मोठा लिव्हिंग एरिया आहे. श्रेयसच्या घरातील इंटिरीअरही फारच उत्तम प्रकारे करण्यात आलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

चौघे जण राहतात या घरात

श्रेयस त्याचे आई-वडील आणि बहिणीबरोबर या घरात राहतो.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

वूडन फ्लोअरिंग

श्रेयसच्या घरातील रुमला वूडन फ्लोअरिंग आहे. यामुळे घराचा लूक अधिकच उठून दिसतो.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

प्रचंड मोठी बाल्कनी

श्रेयसच्या घराला फार मोठी बाल्कनी आहे. या बाल्कनीमधून मायानगरी मुंबईचा भन्नाट व्ह्यू दिसतो. नजर जाईल तिथपर्यंत मुंबई आणि तिला खेटलेला समुद्र इथून पाहायला मिळतो.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

बुटांसाठी वेगळी जागा

श्रेयस हा बुटांची फार आवडत आहे. त्याच्याकडे शेकडोच्या संख्येनं बूट आहेत. म्हणूनच त्याच्या या घरात या बुटांसाठी त्याने वेगळी जागा करुन घेतली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

मोठी बेडरुम

श्रेयस अय्यरच्या घरातील बेडरुमही आकाराने फारच मोठे आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

घरातच जीम

श्रेयस अय्यरच्या घरामध्ये वेगळं जीमही आहे. या जीममध्ये तो क्रिकेटच्या सामन्यांसाठी तसेच इतर वेळीही व्यायाम करतो.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

विराट एवढ्या जवळ राहतो की...

श्रेयस अय्यर राहतो त्याच इमारतीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वास्तव्यास आहेत. या दोघांच्या घरातील अंतर 500 मीटर इतकेचं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 16, 2023

VIEW ALL

Read Next Story