फक्त 39 चेंडूत ठोकल्या 162 धावा; लगावले 23 षटकार, WC दरम्यान जबरदस्त महारेकॉर्ड

25 चेंडूत शतक

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर ल्सूस डु प्लॉयने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ल्यूसने युरोपिअन क्रिकेट चॅम्पिअनशिपमध्ये त्याने फक्त 25 चेंडूत शतक ठोकलं.

39 चेंडूत नाबाद 162 धावा

डु प्लॉयने फक्त 39 चेंडूत नाबाद 162 धावा केल्या. यामध्ये 23 षटकार आणि 4 चौकार होते.

संघाच्या 220 धावा

डु प्लॉयने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या आधारे हंगरीने 10 ओव्हर्समध्ये एक विकेट गमावत 220 धावा ठोकल्या. तुर्की 7 विकेट गमावत फक्त 89 धावा करु शकला.

मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

28 वर्षीय डु प्लॉयने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.

ख्रिस गेलने ठोकलं होतं 30 चेंडूत शतक

ख्रिल गेलने आयपीएल 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरोधात 30 चेंडूत शतक ठोकलं होतं. तो टी-20 सामना होता.

फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 6624 धावा

दक्षिण आफ्रिकेत जन्म झालेल्या डु प्लॉयने 102 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 47.31 च्या सरासरीने 6624 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये डु प्लॉयने 2698 धावा

तसंच 50 लिस्ट-ए सामन्यांमध्ये या क्रिकेटरच्या नावे 54.10 च्या सरासरीने 2002 धावा नोंद आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये डु प्लॉयने 2698 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडसाठी खेळण्याचं स्वप्न

दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं डु प्लॉयचं स्वप्न आहे. डु प्लॉय काऊंटी क्रिकेटसाठी मिडिलसेक्सकडून पुढील हंगामात खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story