पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार बिहारची आमदार

ऑलिम्पिक गेम्स यावेळी फ्रान्सची राजधान पॅरिसमध्ये खेळवले जाणार आहेत. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंचं पथक सहभागी होणार आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदकं जिंकली होती. यावेळी अधिक पदकांचं लक्ष्य आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज श्रेयसी सिंहही सहभागी होणार आहे. श्रेयसी शॉटगन ट्रॅप वुमन्स प्रकारात प्रतिनिधित्व करणार आहे.

श्रेयसी सिंह बिहारच्या जमुई विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावरुन आमदार म्हणून निवडून आलीय. तीने आरजेडीच्या विजय प्रकाश यांचा 41 हजार मतांनी पराभव केला.

श्रेयसी बिहारचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे. श्रेयसीची आई पुतुल सिंह या सुद्धा बांका मतदारसंघात खासदार होत्या.

श्रेयसी सिंहने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सेमध्ये डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं.

तर 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये श्रेयसी सिंहने दमदार कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला होता.

खेळातील योगदान पाहाता 32 वर्षांच्या श्रेयसीला 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

VIEW ALL

Read Next Story