सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर साराचे 60 लाख फॉलोअर्स आहेत.

सारा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्रॅव्हल आणि फूड संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतीच सारा जामनगरमध्ये आपल्या कुटुंबियांसह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाली होती.

आता साराने आपले काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसतेय.

साराच्या एका फोटोत ती एका श्वानाबरोबर दिसतेय. पण यावरुन युजर्समध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही युजर्सच्या मते हे श्वान शुभमन गिलचा आहे.

साराने ज्या श्वानाबरोबर फोटो शेअर केला आहे, तसा हुबेहुब श्वान शुभमन गिलकडे आहे. 15 जुलै 2022 मध्ये त्याने आपल्या श्वानाबरोबर फोटो शेअर केला होता.

सारा आणि शुभमनच्या अफेअरबद्दल नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला दोघांना मुंबईत एका कार्यक्रमात एकत्र पाहिलं गेलं होतं.

VIEW ALL

Read Next Story