वर्ल्ड कप आता तोंडावर असताना इंग्लंडचा माजी स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने वर्ल्ड कप विजेत्या संघावर मोठं वक्तव्य केलंय. पाहा काय म्हणतो...
जर इंग्लंडने विश्वचषक विजेतेपद राखण्यात यश मिळवलं तर ते विलक्षण असेल, परंतु मला वाटतं की जर भारताने त्यांची आदर्श स्पर्धा खेळली तर त्यांना रोखणं खूप कठीण होईल.
जॉस बटलरकडे निश्चितच आव्हानात्मक संघ आहे, ज्यात उच्च धावा करण्याची क्षमता आहे, असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो.
परंतु, मला वाटतं की यजमान आणि अव्वल क्रमांकाचा वनडे संघ या नात्यानं भारतासाठी त्यावर मात करणं खूप कठीण जाईल, असं ब्रॉड याने म्हटलंय.
ऑस्ट्रेलिया त्यांच्या देशात जिंकली. इंग्लंड 2019 साली इंग्लंडमध्ये जिंकली. आता ही परंपरा भारत सांभाळून ठेवेल, असंही ब्रॉड याने म्हटलं आहे.
टीम इंडियाने 1983 आणि 2011 साली वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता 2023 साली भारताच्या नावाची पट्टी वर्ल्ड कपवर लावली जाणार का? असा सवाल आता विचारला जातोय.