टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडियाचं मायदेशात आगमन झालं आहे. दिल्लीत पोहोचल्यावर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर गप्पाही मारल्या.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खेळाडूंबरोबर ट्रॉफीसह फोटो काढला. पण यात एक गोष्ट आकर्षणाची विषय ठरली ती म्हणजे पीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला हात लावला नाही.

टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी पकडली होती. तर पीए मोदी यांनी त्या दोघांचे हात पकडले असल्याचं फोटोत पाहायला मिळतंय.

वर्ल्ड कप ट्ऱॉफीला केवळ चॅम्पियन्स हात लावतात अशी एक मान्यता आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सन्मानार्थ पीएम मोदी यांनी ट्र्रॉफीला हात लावला नाही असं बोललं जातंय.

वर्ल्ड कप ट्रॉफीला हात लावण्याचा हक्क देशाच्या पंतप्रधानांना असतो. पण पीएमो नरेंद्र मोदी यांनी टीम इंडिया आणि खेळाडूंचा सन्मान राखला.

आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर पीएम मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story