T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार

टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज

आयपीएलनंतर टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत स्पर्धेला सुरुवात होईल. टी20 स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

भारत vs पाकिस्तान

त्यानंतर स्पर्धेतला टीम इंडियाचा सर्वात महत्वाचा सामना रंगणार आहे. 9 जूनला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत.

अंपायरची घोषणा

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने अंपायरची घोषणा केली आहे. या सामन्यात रॉड टकर आणि रिचर्ड इलिंगवर्थ अंपायर असणार आहेत.

रिचर्ड इलिंगवर्थ

भारताच्या मोठ्या सामन्यात ज्या ज्या वेळी रिचर्ड इलिंगवर्थ अंपायर होते, त्या त्यावेळी टीम इंडियाला पराभव पत्करावा लागल्याचा इतिहास आहे.

2019 वर्ल्ड कप सेमीफायनल

2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इलिंगवर्थ अंपायर होते. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

भारताचा पराभव

त्यानंतर WTC 2021 आणि WTC 2023 च्या फायनलमध्ये इलिंगवर्थ अंपायर होते, आणि दोन्ही वेळा भारताचा पराभव झाला. आधी न्यूझीलंडने नंतर ऑस्ट्रेलियाने मात केली.

VIEW ALL

Read Next Story