रिंकू सिंह पहिल्यांदाच फलंदाजीसाठी मैदानात उतरला अन् मानाच्या पंक्तीत आला

रिंकू सिंह थेट अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव यांच्या यादीत सहभागी झाला आहे. जाणून घ्या नेमका काय विक्रम केलाय रिंकूने...

Swapnil Ghangale
Aug 21,2023

रिंकू सिंह ठरला स्टार

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये 2-0 ने विजयी आघाडी मिळवली असून दुसऱ्या सामन्याचा स्टार ठरला तो रिंकू सिंह.

मानाच्या यादीत स्थान

रिंकू सिंहने 21 चेंडूंमध्ये त्याने 38 धावा करत थेट अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

पहिल्याच सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार

आपल्या पहिल्याच सामन्यात रिंकूने 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकलाच पण त्याने सर्वाधिक स्ट्राइक रेटने पहिल्याच टी-20 मध्ये धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलंय.

पाचव्या स्थानी रहाणे

या यादीमध्ये अजिंक्य रहाणे पाचव्या स्थानी आहे. त्याने पहिल्या अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये 61 धावा केल्या होत्या. या धावा त्याने 156.41 च्या सरासरीने केलेल्या.

ईशान किशान दुसऱ्या स्थानी

ईशान किशान या यादीत चौथ्या स्थानी असून त्याने आपल्या पहिल्या टी-20 सामन्यात 56 धावा केलेल्या. या धावा त्याने 175 च्या सरासरीने केल्या होत्या.

तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी

तिसऱ्या स्थानी तिलक वर्मा आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात पदार्पण करणाऱ्या तिलकने आपल्या पहिल्याच सामन्यात 39 धावा केल्या त्या 177.27 च्या सरासरीने.

पदार्पणाच्या सामन्यातच रिंकूची दमदार कामगिरी

दुसऱ्या स्थानी रिंकू सिंह आहे. 20 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणाच्या सामन्यात रिंकूने 38 धावा केल्या त्या 180.95 च्या सरासरीने.

मिस्टर 360 डिग्री पहिल्या स्थानी

सर्वाधिक सरासरीने आपल्या पहिल्याच टी-20 मध्ये धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारताचा मिस्टर 360 डिग्री ओळख असलेला सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानी आहे.

सूर्याचा स्ट्राइक रेट किती?

सूर्यकुमार यादवने आपल्या पहिल्याच टी-20 सामन्यात 183.87 च्या सरासरीने 57 धावा केल्या होत्या.

पहिल्या सामन्यात फलंदाजी केली नाही

रिंकू आयर्लंडविरुद्धचा पहिल्या सामनाही खेळला होता. मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याने संधीचं सोनं केलं.

VIEW ALL

Read Next Story