15 खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयने 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केली आहे.

अजित आगरकरने केली घोषणा

निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकारपरिषदेत केली संघाची घोषणा. भारतीय संघात कोणकोण आहेत पाहूयात...

रोहित शर्मा

वर्ल्डकप 2023 मध्ये रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार असणार आहे.

शुभमन गिल

शुभमन गिललाही सलामीवर म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

विराट कोहली

भारतीयांना सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा ज्या खेळाडूकडून आहे तो म्हणजेच विराट कोहलीही संघात आहे.

ईशान किशन

ईशान किशनला फलंदाज म्हणून संघात संधी देण्यात आली आहे. गरज पडल्यास ईशानचा विकेटकीपर म्हणून वापर केला जाईल.

श्रेयस अय्यर

मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यरलाही संधी देण्यात आली आहे.

के. एल. राहुल

सध्या मैदानापासून दुखापतीमुळे दूर असलेल्या के. एल. राहुललाही संघात संधी मिळाली आहे. राहुल भारताचा विकेटकिपर असेल.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवलाही मधल्या फळीतील विश्वासाचा फलंदाज म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाला ही अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

अक्षर पटेल

अक्षर पटेललाही अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

कुलदीप यादव

फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य देण्यात आलं आहे.

जसप्रीत बुमराह

भारतीय गोलंदाजीचा कणा अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान देण्यात आलं आहे.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजलाही वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली आहे.

मोहम्मद शमी

वेगवान गोलंदाजीची धूर ज्या महत्त्वाच्या गोलंदाजांवर असणार आहे त्यात मोहम्मद शमीचा समावेश आहे.

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर हा संघातील 15 वा खेळाडू आहे.

VIEW ALL

Read Next Story