टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पण यावेळी मैदानात नाही तर मैदानाबाहेर हा कारानामा केला आहे.


किंग कोहलीने महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट जगतातील दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.


सर्च इंजिन गूगलने गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या विषयांची यादी जाहीर केली आहे.


या यादीत क्रिकेटर म्हणून गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.


सर्व खेळातील सर्वोत्तम खेळाडूच्या यादीत पोर्तुगालचा फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो टॉपवर आहे.


खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोने लियोनेल मेस्सी, रॉजर फेडरर, राफेल नदाल, आणि जोकोविच सारख्या खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.


38 वर्षांच्या रोनोल्डाने सऊदी अरबचा क्लब अल-नस्त्रशी विक्रमी करार केला आहे. तर 35 वर्षांचा विराट कोहली एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नांमेंटचा मानकरी ठरला होता.

VIEW ALL

Read Next Story