टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला. सूर्यकुमार यादव बेडवर टी20 ट्रॉफी ठेऊन झोपलेला दिसतोय. हा फोटो खूपच व्हायरल झाला.

तर एका फोटोत रोहित शर्माच्या बेडरुममध्ये ट्रॉफी ठेवलेली दिसतेय. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे जिंकलेली ट्रॉफी नेमकी कोणाकडे ठेवली जाते?

टीम इंडियाने ट्रॉफी जिंकल्यानंतर त्या ट्रॉफीबरोबर फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर शेअरही करण्यात आले. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराहने ट्रॉफीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

वास्तिवक वर्ल्ड कप ट्रॉफी खेळाडूंना दिली जात नाही. ती ट्रॉफी आयसीसी स्वत:कडेच ठेवते. तर मूळ ट्रॉफीची रेप्लिका संघाला दिली जाते.

ही रेप्लिका ट्रॉफीही खेळाडूंना किंवा संघाला दिली जात नाही. ही ट्रॉफी क्रिकेट बोर्ड आपल्याकडे ठेवते. म्हणजे टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी बीसीसीआयच्या संग्रहालयात ठेवली जाईल

एकदिवसीय वर्ल्ड कप ट्रॉफी आणि टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफीत बराच फरक असतो. एकदिवसीय वर्ल्ड कप ट्रॉफीत सोन्याचा वापर केला जातो. तर टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीत चांदीचा वापर होतो.

VIEW ALL

Read Next Story