इंग्लंडकडून खेळणाऱ्या नासेर हुसेन याचा जन्म मद्रास येथे झाला होता. त्यानंतर त्याला इंग्लंडकडून खेळण्याचा संधी मिळाली.
दक्षिण आफ्रिकाचा स्टार आक्रमक सलामीवीर हाशिम आमला याचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला होता.
भारतीय शीख पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या रवी बोपारा याने इंग्लंडसाठी दमदार कामगिरी केलीये.
न्यूझीलंडचा स्टार प्लेयर ईश सोडी याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला होता. त्यानंतर त्याने न्यूझीलंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
स्टुअर्ट क्लार्क याचं मूळ भारतात आहे. त्याचे वडील ब्रुस क्लार्क चेन्नईत राहत होते. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळाली.
न्यूझीलंडचा स्टार खेळाडू जीतन पटेल याचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. गुजरातच्या नवसारी येथे त्याचा जन्म झाला होता.
भारतीय संघात स्थान न मिळाल्याने रोहन कन्हाई याने वेस्ट इंडिजकडून खेळण्याचा निर्णय घेतला. रोहन कन्हाईचे कुटुंब भारतात आहे.
साऊथ अफ्रिकेचा स्टार केशव महाराज हा मुळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचा आहे.
न्यूझीलंडचा एजाज पटेल देखील भारतीय वंशाचा आहे. मुंबईमध्ये त्याचा जन्म झाला होता.
कॅनडाच्या टीमकडून खेळणारा आशिष बगई याचा जन्म दिल्ली झाला होता. त्यानंतर त्याने कॅनडाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.