तुमचा विश्वास बसणार नाही पण अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या सचिन तेंडुलकरपेक्षा फलंदाजीमध्ये चक्क एक गोलंदाज आघाडीवर आहे.
सचिन तेंडुलकर 200 कसोटी सामने खेळला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 15000 हून अधिक धावा केल्या आहेत.
कसोटीमध्ये 50 हून अधिक शतकं झळकावणाऱ्या सचिनला कसोटीत कधीच 250 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
सचिनची कसोटीमधील सर्वोत्तम धावसंख्या ही 248 इतकी आहे. 2004 साली सचिनने बांगलादेशविरुद्ध इतक्या धावा केलेल्या.
या 248 धावांच्या खेळीमध्ये सचिन तेंडुलकरने सुनिल गावसकर यांचा 34 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्यानंतर वर्षभराने त्याने 35 वं शकत केलेलं.
मात्र पाकिस्तानच्या एका वेगवान गोलंदाजाने सचिनला ही या बाबतीत मागे टाकलं आहे. पाकिस्तानसाठी खेळणाऱ्या या अष्टपैलू गोलंदाजाने सचिनला सर्वोत्तम धावांबद्दल मागे टाकलं आहे.
सचिन तेंडुलकरने 1999 साली कसोटीमध्ये पहिलं द्विशतक झळकावलं.
मात्र सचिनच्या अनेक चाहत्यांनाही याची कल्पना नसेल पण याबाबतीत पाकिस्तानचा एक गोलंदाज सचिनच्या पुढे आहे.
सचिनच्या आधी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू वसिम अक्रमने कसोटीत द्विशतक झळकावलं आहे. 1996 साली अक्रमने द्विशतक झळकावलं होतं.
वसिम अक्रमने 1996 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीमध्ये 257 धावा केल्या होत्या.
सचिनच्या नावावर कसोटीमध्ये 51 शतकं असून अक्रमच्या नावावर 3 शतकं आहे.